झोडप ‘धारा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 06:15 PM2020-08-05T18:15:44+5:302020-08-05T18:16:17+5:30

सांताक्रूझमधील नाल्यात पडलेली मुलगी बेपत्ताच; शोधकार्य थांबले

Zodap ‘stream’ | झोडप ‘धारा’

झोडप ‘धारा’

googlenewsNext

 

१२१ ठिकाणी झाडे कोसळली
२४ ठिकाणी शॉर्टसर्किट
१४ ठिकाणी घराचा भाग पडला

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला. पावसात सलगता नसल्याने फार कमी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी अधून-मधून कोसळत असलेल्या कोसळधारांमुळे  मुंबापुरीचा वेग रोजच्या तुलनेत कमी झाला असून, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.
मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सांताक्रूझ येथे नाल्यात घर पडून झालेल्या दुर्घटनेत ३ मुली आणि १ महिला नाल्यात पडली. आतापर्यंत १ महिला व २ मुलींना बाहेर काढण्यात आले. यातील शिवन्या मिलिंद काकडे या ३ वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर आहे. तर जान्हवी मिलिंद काकडे (दिड वर्ष) आणि रेखा काकडे (२६) याचा मृत्यू झाला. अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकामार्फत चौथ्या मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री ऊशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. तर बुधवारी सकाळी पाऊस पडत असतानाच पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक गांधी मार्केट आणि सायन रोड नंबर २४ येथून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. 
---------------------

शहरात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण १४ ठिकाणी घराचा भाग पडला.
शहरात ३५, पूर्व उपनगरात २१ आणि पश्चिम उपनगरात ६५ अशी १२१ ठिकाणी झाडे कोसळली.
शहरात १५, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण २४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.
---------------------

येथे साचले पाणी
हिंदमाता, वडाळा येथील शेख मिस्री दर्गा रोड, बीपीटी स्काय वॉक, गांधी मार्केट, सायन रोड नंबर २४, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, दहिसर सबवे, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट येथे पाणी साचले होते. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शेख मिस्त्री दर्गा रोड व पोस्टल कॉलनी वगळता इतर सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा झाला होता.
------------------------

२४ तासांचा पाऊस
शहर ४५.३८ मिमी
पूर्व उपनगर ६९.११ मिमी
पश्चिम उपनगर ८२.४३ मिमी

४ ऑगस्टपर्यंतचा पाऊस.
कुलाबा २ हजार ७२.२ मिमी
सांताक्रूझ २ हजार २५३.९

वार्षिक सरासरी
कुलाबा २ हजार २९२ मिमी
सांताक्रूझ २ हजार ६६८ मिमी

टक्केवारी
कुलाबा ९०.४१
सांताक्रूझ ८४.४८

पाऊस मिमीमध्ये.
कुलाबा ५३.२
सांताक्रूझ ८४.३
ठाणे ११०.६
डाहणू ३८३.१
वांद्रे ५१
भाईंदर १७९
दहिसर १७१
मिरा रोड १८७
राम मंदिर १०७
पुणे ५८
रत्नागिरी २१६.३
महाबळेश्वर ३२०.९
सिंधुर्ग १०७

Web Title: Zodap ‘stream’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.