Join us  

झोक्याने घेतला चिमुकल्याचा जीव

By admin | Published: October 20, 2015 2:14 AM

लहान भावासोबत खेळण्यासाठी ओढणीने बांधलेल्या झोक्यानेच एका अकरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. आपला दादा खेळून दमून झोपल्याचे समजून त्याचा सहा वर्षाचा भाऊ

मुंबई : लहान भावासोबत खेळण्यासाठी ओढणीने बांधलेल्या झोक्यानेच एका अकरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. आपला दादा खेळून दमून झोपल्याचे समजून त्याचा सहा वर्षाचा भाऊ त्याच्या कुशीत झोपून गेला होता. काळीज हेलावून सोडणारी ही दुर्दवी दुर्घटना कांजुरमार्ग मधील शिवकृपानगरात रविवारी सायंकाळी घडलीसोहम मोरे असे मृत बालकाचे नाव असून या दुर्घटनेमुळे कांजूर मार्ग परिसर हळहळून गेला. सोमवारीही सोहमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भांडूप पूर्वेकडील शिवकृपानगर मध्ये माणिक मोरे पत्नी मानसी व दोन मुलांसमवेत रहावयास आहेत. १७ तारखेला कामानिमित्त सोहमचे वडील चेन्नईला गेले होते, तर रविवारी सुट्टी असल्याने आईसोबत ही दोन्ही मुले घरातच होते. साडेचारच्या सुमारास मानसी पार्लरमध्ये गेली. तिने ध्रुवची काळजी घेण्यास सोहमला सांगितले होते. सोहमने ध्रुवसाठी पोटमाळ्यावरील लोखंडी हुकमध्ये आईच्या ओढणीने झोका बांधला. झोका खेळता खेळता अचानक तोच झोका सोहमच्या गळ्याभोवती आवळला. झोक्याच्या ओढणीने दादा गोल गोल फिरत असल्याचे पाहून धू्रवही मजा घेत होता. झोक्याचा गळफास बसत सोहमचा जीव गेला. गळ्यातील फास सुटल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. दादा शांतपणे पडलेला पाहून ध्रुवही त्याच्या कुशीत झोपी गेला. पावणे पाचच्या सुमारास घरी परतलेल्या मानसी घरी परतली. सुरवातीला तिला काही समजलेच नाही. सोहमच्या गळ्याभोवती बसलेला फास त्यात त्याच्या तोंडातून निघालेला फेस पाहून तिने हंबरडा फोडला. तिच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली, तत्काळ सोहमला जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. परिसरात हळहळनेहमी हसत खेळत असलेल्या सोहमच्या दुर्दैवी मृत्यूने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास वडील चेन्नईहून परतताच विक्रोळीच्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलांची काळजी घ्या...वाढत्या वयातील मुलांकडे जरासं दुर्लक्षही कसं नकळत त्यांच्या जीवावर बेतू शकतं याचं ज्वलंत उदाहरण या घटनेवरून घेता येईल. त्यासाठी शक्यतो मुलांना घरी एकटे ठेवणे टाळा, आणि त्यांची काळजी घ्या असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.