मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातामध्ये जखमी झालेल्या समृद्धी निग्तेच्या उपचारांसाठी झुरीचमधील एक तज्ज्ञ डॉक्टर मदत करणार आहेत. कृत्रिम अवयव बसवण्यात तज्ज्ञ असणारे डॉ. मार्टिन बेरली हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती
सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाचे डॉ. सुलेमान र्मचट यांनी सांगितले.
समृद्धी ही अवघ्या तीन वर्षाची आहे. तिची शारीरिक वाढ अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे तिला बसवलेले कृत्रिम पाय हे बदलावे लागणार आहेत. अजूनही तिला कृत्रिम पाय बसवण्यात आलेला नाही. सायन रुग्णालयातील बालचिकित्सा आणि ऑर्थाेपेडिक्स विभाग तिच्यावर उपचार करीत आहे. तिच्या पायाचे फ्रॅक्चर काढल्यावर काही तपासण्या केल्या जातील. एका पायावर चालण्याचा सराव तिच्याकडून करून घेतला जाणार आहे. यानंतरच तिला कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहे. तिला कृत्रिम पाय बसवण्यासाठी बराच वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
4 मे रोजी दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला अपघात झाला होता. यामध्ये नाग्ते कुटुंबीय प्रवास करत होते. तीन वर्षाच्या समृद्धीला या अपघातामध्ये आपला डावा पाय गमवावा लागला आहे. झुरीचमधील डॉ. मार्टिन बेरली हे या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना समृद्धीचे एक्स-रेसह इतर तपासण्यांचे अहवालही पाठवले होते.
या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. यामध्ये कृत्रिम पाय बसवण्याआधी तिच्या पायाचे रिफॅशन करा असे सांगितले आहे. याचबरोबरीने ते सायन रुग्णालयातील बालचिकित्सा आणि ऑर्थाेपेडिक्स विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत, असे डॉ. र्मचट यांनी सांगितले. समृद्धी मोठी होईर्पयत सुमारे 6 ते 7 वेळा तिला कृत्रिम पाय बसवावा लागणार असून, त्यासाठी सुमारे 3क् लाख रुपये खर्च
येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी)