तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे ०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:24+5:302021-08-26T04:10:24+5:30
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी ...
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून, भूजल पुनर्भरणानंतर यंदा ०.०७ टीएमसी पाण्याची वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षणाचा अहवाल संबंधित चमूने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेमार्फत संबंधित प्रकल्प राबविण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संवर्धन हा याचा मुख्य उद्देश होता. तामसवाडा प्रकल्पात भूजल पुनर्भरण प्रक्रियेद्वारा ०.१७ टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होत होते. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर हा आकडा ०.२४ टीएमसीवर गेला आहे. ग्रामीण भागातील विविध कामे, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक पाणी मिळत आहे. तसेच भूगर्भातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. परीक्षण समितीत स्व. भूवैज्ञानिक रवींद्र काळी, ज्ञानेश्वर चन्ने, राजेंद्र देशकर, शिरीष कुलकर्णी, नितीन महाजन, डॉ. पी. के. जैन, दत्ता जामदार, सत्यजित जांभूळकर, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत, डॉ. विजय घुगे, विजय घाटोळे यांचा समावेश होता.