केवळ २२ दिवसात १ लाख पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:39+5:302021-04-16T04:07:39+5:30

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात भयावह रूप धारण केले आहे. केवळ २२ ...

1 lakh positive in just 22 days | केवळ २२ दिवसात १ लाख पॉझिटिव्ह

केवळ २२ दिवसात १ लाख पॉझिटिव्ह

Next

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात भयावह रूप धारण केले आहे. केवळ २२ दिवसात जिल्ह्यात १ लाख नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. त्याचसोबत गुरुवारी संक्रमितांची संख्या ३ लाखापार गेली आहे. पहिल्या १ लाख संक्रमितांची नोंद २३५ दिवसात झाली होती. दुसऱ्या १ लाख संक्रमितांसाठी १४४ दिवस लागले होते. एप्रिल महिन्याच्या १५ दिवसात कोरोनाने शहरात तांडव माजविला आहे. गुरुवारी जिल्ह्यात एकूण संक्रमित ३,०२,८४९ झाले.

नागपूर जिल्ह्यात पहिला संक्रमित रुग्ण ११ मार्च २०२० रोजी आढळला. संक्रमणाच्या पहिल्या महिन्यात केवळ १६ पॉझिटिव्ह आढळले होते. एप्रिलमध्ये १२३, मे मध्ये ३९२, जूनमध्ये ९७२ संक्रमित आढळले होते. त्यानंतर संक्रमणात वाढ झाली. जुलैमध्ये ३८८९, ऑगस्टमध्ये २४,१६३ पॉझिटिव्ह आढळले. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा वेग चांगलाच वाढला होता. ४८,४५७ रुग्ण आढळले होते. ऑक्टोबर महिन्यात थोडा दिलासा मिळाला. सप्टेंबरच्या तुलनेत अर्धेच पॉझिटिव्ह आढळले. नोव्हेंबरमध्ये संक्रमण आणखी कमी झाले. केवळ ८९७९ पॉझिटिव्ह आढळले. तर डिसेंबरमध्ये १२००२, जानेवारी १०५०७, फेब्रुवारीत १५५१४ संक्रमित आढळले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा संक्रमितांच्या संख्येत वाढ झाली. ती अजूनही कायम आहे.

- एप्रिलचे १५ दिवस मार्च महिन्यापेक्षा ठरले भारी

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात संक्रमण प्रचंड वाढले होते. तर मार्च २०२१ या महिन्यात संक्रमणाने सर्व रेकॉर्ड तोडले. मार्चमध्ये ७६२५० पॉझिटिव्ह आढळले व ७६३ लोकांचा मृत्यू झाला; पण एप्रिल महिन्यात कोरोनाचे ब्रेक फेल झाले, असेच दिसते आहे. एप्रिल महिन्याच्या १५ दिवसांच्या आकड्यांनी मार्च महिन्यावर मात केली आहे. एप्रिलच्या अवघ्या १५ दिवसात ७६८११ पॉझिटिव्ह आढळले असून, ९३६ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पंधरवड्यात ९३६ मृत्यू

एप्रिल महिन्याच्या १५ दिवसात कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ९३६ मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने मृत्यूवर नियंत्रण न मिळविल्यास सप्टेंबरमध्ये झालेल्या १४०६ मृत्यूचा आकडा सहज पार होऊ शकतो. संक्रमण कुठल्या पातळीवर जाईल, याचा काही अंदाज नाही. त्याच कारणाने कोरोना नियमांचे पालन करून, त्यापासून स्वत:ची सुरक्षा करणे हा एकमेव उपाय आहे.

दृष्टिक्षेपात...

- पहिले एक लाख संक्रमित २३५ दिवसात झाले.

- दुसरे एक लाख संक्रमित १४४ दिवसात झाले.

- तिसरे एक लाख संक्रमित २२ दिवसात झाले.

- ३ लाखाच्या आकड्यापर्यंत पोहोचायला लागले दिवस

- पहिले ५० हजार संक्रमित १८६ दिवसात

- दुसरे ५० हजार संक्रमित ४९ दिवसात

- तिसरे ५० हजार संक्रमित १२१ दिवसात

- चवथे ५० हजार संक्रमित २३ दिवसात

- पाचवे ५० हजार संक्रमित १४ दिवसात

- सहावे ५० हजार संक्रमित ८ दिवसात

- असे वाढत गेले संक्रमण

१२ सप्टेंबर २०२० - ५०१२८

३१ ऑक्टोबर २०२० - १०२७८६

१ मार्च २०२१ - १५०६६५

२४ मार्च २०२१ - २०३४८८

७ एप्रिल २०२१ - २५४२२१

१५ एप्रिल २०२१ - ३०२८४९

Web Title: 1 lakh positive in just 22 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.