नागपूर, वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:17+5:302021-03-05T04:07:17+5:30

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत ...

10 crore payment from 12,000 farmers in Nagpur, Wardha | नागपूर, वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

नागपूर, वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

Next

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील १२ हजार ६४१ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांनी पैसे भरावे यासाठी महावितरणतर्फे दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील सर्वाधिक ८१९ शेतकऱ्यांनी ६२ लाख २६ हजार रुपयांचा भरणा करून कृषिपंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीतून मुक्तता करून घेतली आहे. सावनेरमधील ७९९ शेतकऱ्यांनी ४८ लाख २८ हजार, काटोल ६३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ७ हजार, नरखेड ५६३ शेतकऱ्यांनी १९ लाख ७३ हजार, पारशिवनी २६८ शेतकऱ्यांनी २१ लाख १५ हजार रुपये, रामटेक २१७ शेतकऱ्यांनी १६ लाख २४ हजार, उमरेडमधील ५२५ शेतकऱ्यांनी ५६ लाख ९५ हजार, भिवापूर ५४६ शेतकऱ्यांनी ५९ लाख १९ हजार, हिंगणा २८९ शेतकऱ्यांनी ३० लाख ३७ हजार, कामठी २५२ शेतकऱ्यांनी ३४ लाख ६ हजाराचा भरणा केला आहे. कुही ४५१ शेतकऱ्यांनी ४८ लाख ९७ हजाराचा, मौदा ५६७ शेतकऱ्यांनी ४४ लाख ९ हजार, नागपूर ७० शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार, नागपूर ग्रामीणमधील ४५६ शेतकऱ्यांनी ३६ लाख ६७ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

वर्धा जिल्ह्यात वर्धा तालुक्यात १,६२० शेतकऱ्यांनी ४५ लाख ७९ लाख तर सेलू १२८७ शेतकऱ्यांनी ६३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आर्वी ६५८ शेतकऱ्यांनी २३ लक्ष ९३ हजार, आष्टी ५८७ शेतकऱ्यांनी १४ लाख १८ हजार, देवळी ८२० शेतकऱ्यांनी ३१ लाख ८७, हिंगणघाट १९२ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार, कारंजा ४१७ शेतकऱ्यांनी ११ लाख ७७ हजार, समुद्रपूर ९६ शेतकऱ्यांनी ७ लाख ४२ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

Web Title: 10 crore payment from 12,000 farmers in Nagpur, Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.