नागपुरात रोज होते १५ टन अन्नाची नासाडी

By admin | Published: October 16, 2015 03:25 AM2015-10-16T03:25:26+5:302015-10-16T03:25:26+5:30

भारताला एकीकडे अन्नाअभावी मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी केली जात आहे,

15 tons of food waste every day in Nagpur | नागपुरात रोज होते १५ टन अन्नाची नासाडी

नागपुरात रोज होते १५ टन अन्नाची नासाडी

Next

हॉटेलमधून सर्वाधिक निघते खरकटे :
बुफे संस्कृतीतूनही वाया जाते अन्न

नागपूर : भारताला एकीकडे अन्नाअभावी मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी केली जात आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात रोज तीन ट्रक अन्न कचऱ्यात फेकले जाणे हे अधिक गंभीर असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
अन्ननासाडी ही चिंताजनक आणि संतापजनक असली तरी नागपुरात सार्वजनिक प्रसंग, उत्सव किंवा पारिवारिक समारंभ व हॉटेल्समध्ये सर्वात जास्त अन्ननासाडी होते. तज्ज्ञाच्या मते, पंक्ती, जेवणावळींमध्ये वाढणारा आणि खाणारा यांचा मेळ नसतो. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. विनाकारण आग्रह करून खाऊ घालण्याच्या प्रयत्नातही अन्न वाया जाते. अन्नाची नासाडी टळावी, कमी व्हावी यातून स्वरूची भोज, बुफेची संकल्पना पुढे आली. त्यातून नासाडी कमी होणे दूरच, ती पंगतीपेक्षाही दुपटीने वाढली आहे. बुफे संस्कृतीत किती खावे, यापेक्षा कसे घ्यावे, कसे खावे याचेही प्रशिक्षण देणे आवश्यक झाले आहे. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे, हे खरे असले तरी नवश्रीमंत वर्ग, उच्च मध्यम व मध्यमवर्गाकडून ‘हॉटेलिंगह्णचा वापर वाढला आहे. आॅर्डर करताना अंदाज न घेता डिशेसची मागणी केली जाते. भुकेचा अंदाज न घेतला गेल्याने बऱ्याचदा अन्न शिल्लक राहते. ते तसेच टाकून उठण्याची खोड सवयीत रूपांतरित झाली आहे. त्याचा परिणाम हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात खरकटे अन्न फेकले जाते. गरजेपेक्षा दोन घास कमीची आॅर्डर केल्यास अन्नाची नासाडी टाळता येणार आहे. परंतु शहरात तसे होताना दिसून येत नाही. महापालिकेच्या हद्दीत सुमारे दोन हजारावर हॉटेल्स आहेत. यातील अनेक हॉटेल्सचालक उरलेले अन्न रात्री उशिरा कचरापेटीत किंवा नाल्यात फेकतात तर काही नियमानुसार मनपाकडे सुपूर्द करतात. अशा हॉटेल्सची केवळ ९०० वर संख्या आहे. यांच्याकडून रोज १५ टन खरकटे अन्न मिळते. नागपुरात अर्धपोटी व उपासमार सहन करीत जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रोज वाया जणाऱ्या या अन्नावर या भुकेल्यांना चार घास मिळू शकतील एवढे हे अन्न आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 15 tons of food waste every day in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.