संरक्षणासाठी १९१ सैनिक तयार
By admin | Published: May 9, 2017 01:50 AM2017-05-09T01:50:03+5:302017-05-09T01:50:03+5:30
कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटर येथे ३४ आठवड्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन तब्बल १९१ गाडर््समनने लढाऊ सैनिकाचा दर्जा प्राप्त केला.
गार्ड्स रेजिमेंटल सेंटर : इंदर सिंहने पटकावला सर्वश्रेष्ठ रिक्रूटचा पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटर येथे ३४ आठवड्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन तब्बल १९१ गाडर््समनने लढाऊ सैनिकाचा दर्जा प्राप्त केला. शनिवारी कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या मैदानावर पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्यांना हा दर्जा बहाल करण्यात आला. यावेळी इंदर सिंह यांनी सर्वोत्कृष्ट रिक्रूटचा पुरस्कार पटकावला.
गाडर््स रेजिमेंटल सेंटरतर्फे सैन्यात नव्याने भर्ती झालेल्या गार्ड्सला प्रशिक्षण दिले जाते. ३४ आठवड्यांचे हे अतिशय खडतर प्रशिक्षण असते. यात शारीरिक आणि मानसिकरित्या प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणानंतर या गार्डसला खऱ्या अर्थाने लढाऊ सैनिकांचा दर्जा बहाल केला जातो यानंतर हे सैनिक देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे तयार होतात.
३४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या सैनिकांचा आज दीक्षांत समारंभ होता. गाडर््स रेजिमेंटच्या मैदानावर यावेळी या सैनिकांनी विशेष परेड केली. गाडर््स रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर डी.व्ही. सिंह यांनी या परेडचे अवलोकन केले. विविध क्षेत्रात चांगले प्रदर्शन करणाऱ्या रिक्रूटला यावेळी पुरस्कृत करण्यात आले. टीपू ट्रेनिंग कंपनीचे रिक्रूट इंदर सिंह यांना सर्वश्रेष्ठ रिक्रूट ट्रॉफी प्रदान करण्यात आली.