२८ प्रतिष्ठानांना १.९८ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:15+5:302021-05-28T04:07:15+5:30

मनपाची कारवाई : ५० प्रतिष्ठानांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी गुरुवारी २८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ...

1.98 lakh fine to 28 establishments | २८ प्रतिष्ठानांना १.९८ लाखांचा दंड

२८ प्रतिष्ठानांना १.९८ लाखांचा दंड

Next

मनपाची कारवाई : ५० प्रतिष्ठानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी गुरुवारी २८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ९८ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार, धंतोलीच्या पथकाने नऊ दुकानांची तपासणी करून १३ हजारांचा दंड वसूल केला. हनुमाननगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांकडून १० हजार, नेहरूनगर येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १३ हजार रुपये, गांधीबाग येथे सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून ५५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, लकडगंजमध्ये तीन दुकानांची तपासणी करून २५ हजार, आशीनगर पथकाने दहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 1.98 lakh fine to 28 establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.