लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, तर कुणाच्या मुलांच्या वापरात आले. सध्या तर जि.प.च्या एकही सदस्य अथवा पदाधिकाऱ्याकडे टॅबलेट दिसत नाही.केंद्र सरकारने घोषित केलेल्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर सदस्यही अपडेट व्हावा व ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक योजना आणि उपक्रमांची माहिती पोहचविण्यासाठी त्या सदस्यांना टेक्नोसॅव्ही करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला होता. यासाठी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी जि.प. ला पत्र पाठवून टॅबलेटला मंजुरी दिली. यानंतर जि.प.ने निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी करून आपल्या स्वत:च्या सेसफंडातून प्रति टॅबलेट सुमारे ४० हजार अशी ५८ टॅबसाठी २१ लाखावरची तरतूद केली. अॅपल कंपनीच्या टॅबची खरेदी केली. टॅब कशा पध्दतीने हाताळावा यासाठी जि.प.च्या खेडकर सभागृहात सर्व सदस्यांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. हे टॅबलेट निवडणुका लागल्यानंतर जि.प.प्रशासनाकडे परत करावे लागणार, अशी अट यात घातल्या गेली होती.विशेष म्हणजे टॅब परत करण्याची अट घातल्यामुळे तो घेण्यासाठी अनेकांनी नकार देऊन नंतर तो स्वीकारलाही. तर एक-दोन सदस्यांनी शेवटपर्यंत तो टॅबही स्वीकारला नाही. ज्या सदस्यांनी तो टॅब स्वीकारला त्यानंतर कधीच कुठल्याही सदस्यांकडे तो टॅब दिसूनही आला नाही.वापरच नाही, तर उद्दिष्ट साध्य कसे होणार ?जि.प.अंतर्गत राबविण्यात येणा ऱ्या योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी टॅबलेटचा वापर करण्यात येणार होता. जि.प. सदस्य अपडेट राहावेत, त्या उद्देशाने तंत्रज्ञानाशी सदस्यांची मैत्री होणार होती. ग्राम विकास व अन्य विभागांच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहचविता येतील, यासाठी सदस्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला व त्याचे वाटपही करण्यात आले. परंतु टॅबचा वापरच नसल्याने जे उद्देश टॅब देण्यामागे होते, ते उद्देश साध्य होऊच शकत नाही.
२१ लाखांचे टॅबलेट नागपूर जिल्हा परिषद सदस्यांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 9:07 PM
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, तर कुणाच्या मुलांच्या वापरात आले. सध्या तर जि.प.च्या एकही सदस्य अथवा पदाधिकाऱ्याकडे टॅबलेट दिसत नाही.
ठळक मुद्देमाहिती तत्रज्ञानाच्या वापराबद्दल उदासिनता