२४ तासातच नागपूर जिल्ह्यात १६ नवे कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या परत शंभरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 07:26 PM2021-09-22T19:26:13+5:302021-09-22T19:26:50+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत परत वाढ झाली असून, बुधवारी जिल्ह्यात १६ नवे बाधित आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत परत वाढ झाली असून, बुधवारी जिल्ह्यात १६ नवे बाधित आढळले. या आकडेवारीमुळे प्रशासनाची चिंतादेखील वाढली असून, सक्रिय रुग्णसंख्यादेखील शंभरीकडे जात आहे. (In 24 hours, 16 new coronaviruses in Nagpur district)
बुधवारच्या अहवालानुसार शहरात १२, ग्रामीणमध्ये १ व जिल्हाबाहेरील तीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४ लाख ९३ हजार २३१ इतकी झाली आहे. यात शहरातील ३ लाख ४० हजार २२४ तर ग्रामीणमधील १ लाख ४६ हजार १६७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. यात शहरातील ६६, ग्रामीणमधील २० व जिल्हाबाहेरील सहा रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी एकूण सहा रुग्ण कोरोनातून ठीक झाले.
चाचण्यांची संख्या घटली
दरम्यान, चाचण्यांची संख्या मात्र घटल्याचे दिसून आले. बुधवारी जिल्ह्यात ४ हजार ११८ चाचण्या झाल्या. यात शहरातील ३ हजार २९४ तर ग्रामीणमधील ८२४ चाचण्यांचा समावेश होता.