लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलिसांनी माेवाड (ता.नरखेड) शिवारात कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात २१ जनावरांची सुटका करण्यात आली असून, चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई गुरुवारी (दि.२१) मध्यरात्री करण्यात आली.
संतलाल मेहतरसिंग धुर्वे, बालचंद घसीटालाल उईके दाेघेही रा. दराेडा (खुर्द), जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश, शाहरुख अहमद शमीम अहमद पठाणे व रहीमखाँ वहीदखाँ पठाण दाेघेही रा.बैसवाही, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश अशी आराेपींची नावे आहेत. नरखेड पाेेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माेवाड शिवारातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली. यात पाेलिसांनी एमपी-२२/एच-०७४३ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये पाेलिसांना २० रेडे व एक म्हैस अशी एकूण २१ जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे, तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी ट्रकमधील चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि गुरांची सुटका करीत ट्रक जप्त केला. या गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या कारवाईमध्ये २३ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १ लाख १५० हजार रुपये किमतीची जनावरे, असा एकूण २४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे तपास अधिकारी तथा सहायक पाेलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी दिली. या प्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.