लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तोतलाडोह कोरडा पडला असून नवेगाव-खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक आहे. अशी भीषण परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेमध्ये मंगळवारीही बैठक घेण्यात आली. दरम्यान, बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. पाण्याच्या मोठ्या ग्राहकांसंदर्भात धोरण तयार करण्याची मनपाची योजना आहे. कन्हानमध्ये पाण्याचा स्तर चांगला आहे. त्यामुळे नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा करण्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. परंतु, हा विचार प्रत्यक्षात उतरतो की नाही हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे. पाणी पुरवठ्याचे पुढील नियोजन पावसावर अवलंबून आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत बुधवारनंतर शुक्रवारी (१९ जुलै) व रविवारी (२१ जुलै) पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.तर पाईप लाईनमध्ये दूषित पाणीशहरात २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेंतर्गत जुनी पाईप लाईन बदलवून नवीन पाईप लाईन टाकली जात आहे. आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६६ टक्के पाईप लाईन अद्यापही जुनी आहे. त्या पाईप लाईनमध्ये लिकेज आहेत. पाणी पुरवठा बंदच्या काळात त्या पाईप लाईनमध्ये दूषित पाणी शिरू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना दूषित पाणी मिळू शकते. पाईप लाईन चार्ज असते त्यावेळी त्यात दूषित पाणी शिरत नाही.विहिरी व बोअरवेलचा वापर वाढेलमनपाच्या पाणी कपातीमुळे नागरिक विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग वाढवू शकतात. मनपाने शहरातील ७५५ पैकी ४४१ विहिरींची सफाई केली आहे. ३१४ विहिरी दूषित आहेत. शहरात ५२५४ जुन्या बोअरवेल असून २७७ नवीन बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरमधील वस्त्या बोअरवेलवर अवलंबून आहेत.
नागपुरात आज ३.५ लाख नळ राहणार कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:22 AM
१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देटँकरही चालणार नाही : संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद