रामटेक : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ३ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काचूरवाही येथे साेमवारी (दि. ८) मध्यरात्री घडली.
रवींद्र तुकाराम साेमनाथे, रा. काचूरवाही, ता. रामटेक व त्यांचे कुटुंबीय साेमवारी रात्री गाढ झाेपेत हाेते. त्यातच अज्ञात चाेरट्याने खिडकीची तावदाने काढून घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील ३ लाख ५०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि ९२ हजार रुपये राेख असा एकूण ३ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच रवींद्र साेमनाथे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी पंचनामा करीत श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेतली हाेती. मात्र, त्यांना काेणताही ठाेस सुगावा मिळाला नाही. उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद काेडकर व गाेरखनाथ निंबार्ते करीत आहेत.