लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौक व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. परंतु शहरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गांधीबाग झोन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमातील तक्रारींच्या माध्यमातून निदर्शनास आली. स्मार्ट सिटी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दत्ता शिर्के यांनी शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात बंद असल्याची तक्रार केली होती. महापालिका व वाहतूक पोलिसांनी याची माहिती घेऊ न बंद पडलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महापालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चाफले, झोन सभापती वंदना यंगटवार यांच्या प्रभाग २२ मधील संतप्त नागरिकांनी गडरलाईन, अरुंद रस्ते व अतिक्रमणाच्या तक्रारी मांडल्या. चाफले प्रभागात फिरत नसल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी शहरात विकासाचे मोठे प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र दुसरीकडे प्रभागातील नगरसेवक नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवीत नसल्याचे चित्र आहे. कार्यक्रमात १७२ तक्रारी मांडण्यात आल्या. नवीन शुक्रवारी, फवारा चौक, गांधीबाग, जुनी मंगळवारी या भागात पार्किंगच्या प्रचंड समस्या नागरिकांनी मांडल्या.अतिक्रमण हटविण्याबाबत संतप्त भावना नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके यांनी व्यक्त केल्या. महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण हटविण्याबाबत उदासीन असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. झोन कार्यालयाच्या बाजूलाच अतिक्रमण असल्याचे दटके यांनी सांगितले. मध्य नागपूरमध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासून असलेला अवैध मासोळी बाजार अजून प्रशासन हटवू शकले नाही. या बाजारासाठी कळमना येथे जागा उपलब्ध असताना तो स्थानांतरित होत नाही, याकडे लक्ष वेधून हा बाजार वस्तीत असल्यामुळे प्रचंड घाण आणि दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले.लकडगंज झोनशेजारी लीजवर देण्यात आलेल्या महापालिकेच्या जागेवर मोठमोठे गोडाऊन बांधण्यात आले. पण महापालिकेचे लक्ष नाही. तेथे झोपडपट्टीही वसली आहे. या आठ एकर जागेकडे मनपाचे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला. मोमीनपुऱ्यातील बकरामंडी व जुनी मंगळवारीतील मटन मार्केट हटविण्याची मागणीही करण्यात आली.२५० शाळा डिजिटल करणारआजच्या जनसंवाद कार्यक्रमात सुमारे १० विषयांवर वेगळी बैठक घेण्याची गरज निर्माण झाल्याचे पाहून, पालकमंत्र्यांनी येत्या १४ जानेवारीला या विषयांच्या बैठकी आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. मनपाच्या २५० शाळांच्या ५०० खोल्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव द्यावा, यासाठी शासनाकडून निधी देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.अधिकाऱ्यांकडून दिशाभूलमॉडेल मिल ते सीपी अॅण्ड बेरार कॉलेज या रस्त्याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी ठरली. वर्षभरापासून या जागेची मोजणी सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठ़ी लोक जागा देण्यास तयार आहेत, पण मनपा कारवाई करायला तयार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनपा आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या, पण रस्ता नाही. वर्षभरापूर्वी कामाचे कार्यादेश दिले, पण काम सुरू नसल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊत यांनी निदर्शनास आणले. मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेल, भंडारा रोड हा रस्ता रुंदीकरणाची मागणी केली.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करामोकाट कुत्री आणि डुकरांची समस्या मध्य नागपुरात मोठ्या प्रमाणात आहे. यश पटेल हा मुलगा कुत्रा चावल्याने दगावला. या घटनेची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले.घराच्या नामफलकावर टांगल्या कोंबड्यागांधीबाग, इतवारी ही दाटीवाटीची वस्ती. या वस्तीतील रस्त्यावर असलेले अतिक्रमण मनपा हटवत नाही. तक्रार केल्यावरही अतिक्रमण हटत नाही. त्यांची दादागिरी सुरू आहे. लकडगंज झोनसमोर व्यापाºयांची घरे आहेत. त्यांच्या घराच्या पाट्यांवर कोंबड्या टांगल्या जातात. पोलिसही तेथून कोंबडी विकत घेऊन जातात. आम्ही शाकाहारी आहोत, ही समस्या सोडविण्याची विनंती प्रतिनिधी प्रताप मोटवानी यांनी केली.
नागपुरात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद :जनसंवाद कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 11:18 PM
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौक व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. परंतु शहरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गांधीबाग झोन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमातील तक्रारींच्या माध्यमातून निदर्शनास आली. स्मार्ट सिटी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देसभापतींच्याच प्रभागात सर्वाधिक समस्या