लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्र्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन सोडून राज्याच्या इतर विभागात काही अटींवर २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात जिल्ह्यांतर्गत ४८ बसेस चालविण्यात येणार आहेत.नागपूर विभागात २२ मे पासून या बसेसची वाहतूक सुरु होईल. याबाबत विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले की, नागपूर विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी ८ आगाराच्या माध्यमातून ४८ बसेस चालविण्याची योजना आखण्यात आली आहे. या बसेस काटोल-नागपूर, काटोल-कोंढाळी, काटोल-नरखेड, सावरगाव-नरखेड, काटोल-सावनेर, सावनेर-रामटेक, नागपूर-मौदा, नागपूर-कुही, नागपूर-उमरेड, नागपूर-पारशिवनी आदी महत्त्वाच्या मार्गांवर चालविण्यात येतील. या बसेसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी राहणार नाहीत. त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास संबंधित मार्गावर अतिरिक्त बस चालविण्यात येईल. प्रत्येक तासाला या बस उपलब्ध होतील. गरज भासल्यास हा कालावधी वाढविला जाऊ शकतो. या बसेस सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सेवा देतील. ज्या मार्गावर प्रवासी कमी असतील तेथील बस इतर मार्गावर वळविण्यात येतील. सर्व बसेस आणि बसस्थानकाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. चालक, वाहकांना मास्क आणि सॅनिटायझरची बॉटल देण्यात येणार आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’कडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल. प्रवास सुरू होण्यापूर्वी प्रवासी आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांचे हात सॅनिटायझरने निर्जंतुक करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठीच प्र्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात एसटीच्या ४८ बसेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:05 PM
कोरोनाचा प्रादुर्र्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन सोडून राज्याच्या इतर विभागात काही अटींवर २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात जिल्ह्यांतर्गत ४८ बसेस चालविण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देशुक्रवारपासून देणार सेवा : ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणार