गणेश हुडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा धोका विचारात घेता शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याला अद्याप अनुमती दिलेली नाही. चार महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने फेरीवाल्यांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे राज्य शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर शहरातील ५१ क्षेत्र फेरीवाला झोन म्हणून घोषित केले होते. परंतु हा निर्णय कागदावरच आहे. अंमलबजावणी कुठे अडली, असा प्रश्न फेरीवाल्यांना पडला आहे.
नागपूर शहरात ६० ते ७० हजार फेरीवाले हातगाडीवर व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. परंतु शासन धोरणामुळे मागील चार महिन्यांपासून फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प आहे. केंद्र सरकारने फेरीवाल्यांना संरक्षण दिले आहे. यासाठी फेरीवाला समिती गठित करून फेरीवाल्यांच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेने अद्याप फेरीवाला समिती गठित केलेली नाही. अतिक्रमणाच्या नावाखाली वेळोवेळी होणाऱ्या कारवायांमुुळे फेरीवाले व मनपा प्रशासनात अनेकदा संघर्ष निर्माण होतो.असे आहेत फेरीवाला झोनबजाजनगर चौक ते अभ्यंकर चौक, बारा पोलीस चौकी ते इंदोरा चौक, आरटीओ कार्यालय ते भगवा घर चौक, आरटीओ कार्यालय ते पाटणकर चौक, सदर मंगळवारी मार्केट, जरीपटका बस स्टँड, पोलिस लाईन टाकळी, पोलीस तलाव चौक, कल्पना टॉकीजसमोर, जाफरनगर, फ्रेंड्स कॉलनी, मशिदीसमोर नवापुरा, चंद्रलोक बिल्डिंग, लकडा पूल हातीनाला, मेडिसीन मार्केट गांधीबाग, गंगाबाई घाट भिंतीजवळ, बिनाकी मंगळवारी, लाल गंज झाडे चौक, जुना कामठी रोड, चिंतामणीनगर, शांतिनगर चौक, बिनाकी मंगळवारी, भीम चौक, गरोबा मैदान, एनआयटी क्वॉर्टर, देवीनगर कपिल नगर शिक्षक सहकारी बँकेच्या बाजूला, टिपू सुलतान बाजार, आयटीआय पार्क, खामला भाजीमंडी, जयताळा बाजार, आरपीटीएस कॉलनी, गायत्रीनगर, संभाजीनगर, पायोनिअर सोसायटी, बजाजनगर खामला मटण मार्केट, सीताबाईनगर बाजार, एनआयटी गार्डन त्रिमूर्तीनगर, रविनगर, व्हेटरनरी चौक सेमिनरी हिल्स, फुटाळा तलाव, ट्रॅफिक पार्क, दुबई मार्केट जिल्हाधिकारी कार्यालय, भरतनगर चौक, चंद्रमणीनगर, एम्प्रेस मॉल, अजनी चुनाभट्टी, मॉडेल मिल, बसस्टॅण्डसमोर, केडीके कॉलेज, सक्करदरा जगनाडे चौक.मनपा निर्णय घेण्यास सक्षमनागपूर शहरात अद्याप फेरीवाला समिती गठित झालेली नाही. फेरीवाला झोन घोषित करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्णयाची गरज नाही. महापालिका प्रशासन यासाठी सक्षम आहे परंतु फेरीवाल्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.- रज्जाक कुरैशी, अध्यक्ष, फेरीवाला संघटना