प्रजासत्ताकदिनी नागपुरात ५६ हजार नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 10:45 AM2021-01-28T10:45:44+5:302021-01-28T10:46:17+5:30
Nagpur News प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला नागरिकांनी मोठ्या संख्येने मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत ५६ हजार ४०६ प्रवाशांनी एका दिवसात ऑरेंज आणि अॅक्वा लाईनवर मेट्रो रेल्वेतून प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला नागरिकांनी मोठ्या संख्येने मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत ५६ हजार ४०६ प्रवाशांनी एका दिवसात ऑरेंज आणि अॅक्वा लाईनवर मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. ही आकडेवारी आधीच्या रेकॉर्ड रायडरशिपच्या तुलनेत तिप्पट अधिक आहे.
मेट्रो रेल्वे प्रजासत्ताक दिनानिमित्त रात्री ९ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. यापूर्वी मेट्रो रेल्वे प्रकल्पात सर्वाधिक रायडरशिप २७ डिसेंबर २०२० रोजी २२,१२३ नोंदविण्यात आली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी देशाच्या इतर मेट्रोच्या तुलनेत अधिक रायडरशिप होती. मंगळवारी मेट्रो रेल्वेस्थानकावर प्रवासी मोठ्या संख्येने पोहोचले. सीताबर्डी इंटरचेंजवर प्रवाशांच्या रांगा लागल्या. कॉन्कोर्स एरियामध्येही सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची ये-जा सुरू होती.सुभाषनगर मेट्रो स्टेशनवर सीआरपीएफ पथकाने बॅन्ड सादर केला.
...............