नागपुरात विनामास्क ७४४ नागरिकांना दंड : मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:28 PM2020-09-14T21:28:07+5:302020-09-14T21:29:24+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्यांना २०० ऐवजी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्तांनी जारी केले. परंतु दंडाची रक्कम वाढल्यानंतरही मास्क न लावता फिरणाऱ्याची संख्या कमी झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्यांना २०० ऐवजी ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश सोमवारी मनपा आयुक्तांनी जारी केले. परंतु दंडाची रक्कम वाढल्यानंतरही मास्क न लावता फिरणाऱ्याची संख्या कमी झालेली नाही.
सोमवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्कशिवाय फिरणाºया ७४४ नागरिकांकडून १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील ११ दिवसात ५०३२ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १० लाख ६ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे.
सोमवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५२, धरमपेठ १०१, हनुमाननगर १६१, धंतोली ८६, नेहरुनगर २३, गांधीबाग ३४, सतरंजीपुरा ७७, लकडगंज ३२, आशीनगर ९५, मंगळवारी ७६ आणि मनपा मुख्यालयात ७ जणांविरुद्ध शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
झोननिहाय ११ दिवसात कारवाई
लक्ष्मीनगर - ३९७
धरमपेठ - १११०
हनुमाननगर - ४९५
धंतोली -५३६
नेहरुनगर - ३११
गांधीबाग -३३९
सतरंजीपुरा - ३३५
लकडगंज - ३१६
आशीनगर - ५०८
मंगळवारी - ६४४
मनपा मुख्यालय - ४१