लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील ६५, ग्रामीणमधील १० आणि जिल्ह्याबाहेरचे १२ जण आहेत. ऑगस्ट महिन्यात नागपूर जिल्ह्यात २४,१६३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ९१९ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे कोरोना आता अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर नियंत्रण मिळवण्याची प्रशासनाची कुठलीही तयारी दिसून येत नाही.नागपूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी १७०३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये नागपूर शहरातील १४७४, नागपूर ग्रामीणचे २२१ आणि जिल्ह्याबाहेरच्या ८ जणांचा समावेश आहे. तसेच ४१ मृत्यू झाले. यात २८ शहरातील, ५ ग्रामीणचे आणि ८ जिल्ह्याबाहेरचे आहेत. तसेच १ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात १४४७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील ११६८, ग्रामीणमधल २७५, जिल्ह्याबाहेरचे ४ आहेत. तर ४७ मृत्यू झाले. यात शहरातील ३७, ग्रामीणचे ५, आणि ४ जिल्ह्याबाहेरचे आहे.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३२,७०५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून ११३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २५,५०० शहरातील आहेत. ६९१३ ग्रामीणमधील तर २९२ जिल्ह्याबाहेरचे आहेत. एकूण मृतांमध्ये शहरातील ८५९, ग्रामीणमदील १६३ आणि जिल्ह्याबाहेरचे ११० आहेत.बुधवारी एंटीजन टेस्टमध्ये ७९९ पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी लॅबमध्ये ४३८, एम्सच्या लॅबमध्ये ७९, मेडिकलच्या लॅबमध्ये ८७, मेयोच्या लॅबमध्ये १८०, माफसू, ७८ आणि निरीच्या लॅबमध्ये ४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.दोन दिवसात बरे झाले २४१२ कोरोना रुग्णनागपूर जिल्ह्यात ज्या गतीने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या गतीने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात २४१२ रुग्ण बरे झाले आहेत. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात १३५३ आणि २ सप्टेंबर रोजी १०५९ रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकूण २१,६५६ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६६.२२ टक्के इतके आहे. परंतु नवीन मिळणाऱ्या पॉझिट्हि रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.अॅक्टीव्ह ९९१७बरे झालेले २१,६५६मृत ११३२
CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसात ८७ मृत्यू, ३१५० नवीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 11:00 PM