९०.७२ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:08 AM2021-02-08T04:08:52+5:302021-02-08T04:08:52+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पाेलिसांनी कन्हान नदीवरील येसंबा रेतीघाटात धाड टाकली. यात रेतीचा अवैध उपसा करीत असलेल्या तीन ...

90.72 lakh worth of property confiscated | ९०.७२ लाखाचा मुद्देमाल जप्त

९०.७२ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : पाेलिसांनी कन्हान नदीवरील येसंबा रेतीघाटात धाड टाकली. यात रेतीचा अवैध उपसा करीत असलेल्या तीन रेती तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ९० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात पाेकलॅण्ड मशीन, जेसीबी, ट्रक, कार व रेतीचा समावेश आहे. ही कारवाई रविवारी (दि. ७) मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये रत्नाकर नत्थू चक्रपाणी (४९, रा. मिलिंद चौक, खापरखेडा, ता. सावनेर), मोहम्मद शोएब मोहम्मद शब्बीर अन्सारी (१९, रा. कमसरी बाजार, कामठी) व रमीज खान हमीद खान (२६, रा. कादर झेंडा, कामठी) या तिघांचा समावेश असून, रिजवान शेख, रा. कामठी असे पळून गेलेल्या आराेपीचे नाव आहे. कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना येसंबा शिवारातील कन्हान नदीच्या घाटातून रेतीची उचल केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती.

या माहितीच्या आधारे पाेलिसांनी येसंबा घाटाची पाहणी केली. दरम्यान, पाेलिसांना घाटात रेतीचा उपसा करणारी पाेकलॅण्ड मशीन, जेसीबी, ट्रक व इतर वाहने आढळून आली. त्यामुळे त्यांनी लगेच धाड टाकली. यात पाेलिसांनी तिघांना अटक केली तर एक जण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या कारवाईमध्ये ३० लाख रुपयाची विना क्रमांकाची पाेकलॅण्ड मशीन, २० लाख रुपयाची एमएच-४०/बीई-८०२७ क्रमांकाची जेसीबी, १० लाख रुपयाचा एमएच-४०/एन-०१६८ क्रमांकाचा ट्रक, १० लाख रुपयाचा एमएच-३१/एम-६३६६ क्रमांकाचा ट्रक, पाच लाख रुपयाची एमएच-४०/ए-३५२ क्रमांकाची क्वाॅलिस, आठ लाख रुपयाची एमएच-४०/ए-३७४९ क्रमांकाची ब्रेझा, १२ हजार रुपये किमतीची ट्रकमधील रेती, ७ लाख ५० हजार रुपयाची नदीलगतच्या शेतातील २५० ब्रास रेती, १२० लिटर डिझेल असा एकूण ९० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दिली.

याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४, ११० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, उपनिरीक्षक सुरजुसे, कुणाल पारधी, राजेंद्र गौतम, शरद गीते, सुधीर चव्हाण, सम्राट वनपर्ती, जितेंद गावंडे यांच्या पथकाने केली.

Web Title: 90.72 lakh worth of property confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.