शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

By सुनील चरपे | Published: November 05, 2022 4:11 PM

धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले.

केळवद : समोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. त्यामुळे बस रोडच्या खाली उतरली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. यात बस व कारमधील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर- केळवद मार्गावरील परसोडी शिवारात शनिवारी (दि.५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

अभिकेत प्रभाकर लिचडे (२५, रा. राजीवनगर, सोमलवाडा, नागपूर), असे मृत कारचालकाचे नाव असून, जखमींमध्ये कारमधील निर्भय मेघराज चन्ने (२५), पीयूष विजय बांगडे (२५) व शुभम राजू ठाकरे (२५), तिघेही रा. सोमलवाडा, नागपूर यांच्यासह बसधील वासुदेव नत्थू श्रीरामे (७६, रा. भोलेनगर, हुडकेश्वर, नागपूर), सीताराम जयराम रेपाटे (७६, रा. हुडकेश्वर, नागपूर व दीपा चैतराम चौरे (३७, रा. वॉर्ड क्रमांक-१, केळवद, ता. सावनेर) या तिघांचा समावेश आहे. त्या सहाही जणांना उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

अनिकेत व त्याच्या तीन मित्रांनी शनिवारी सकाळी जामसावळी, ता. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पूजा-आरती केली आणि एमएच-४०/सीएच-०११८ क्रमांकाच्या कारने ते केळवद, सावनेरमार्गे नागपूरला जायला निघाले. केळवद- सावनेरदरम्यानच्या परसोडी (ता. सावनेर) शिवारात येताच अनिकेतने कारसमोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजे सावनेरहून केळवद येथे जाणारी एमएच-४०/एच-९९९२ क्रमांकाची बस जवळ येताच अनिकेतचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार बसवर धडकली.

धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अनिकेतचा मृतदेह व जखमींना सावनेरात पाठविले. जखमींवर सावनेरातील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी पीयूष बांगडे यांच्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक कामटे करीत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जीवावर उठले

सावनेर- केळवद- सौसर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल वसूल केला जातो. पाच वर्षांपासून या रोडची दैन्यावस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी रोडवरील खड्ड्यांचा आकार व खोली वाढत आहे. या रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जीवावर उठले आहे.

अर्धी बाजू बरी, अर्धी खराब

या रोडची एक बाजू बरी असून, दुसरी खराब आहे. खराब बाजूवरून वाहन चालविताना त्रास होत असल्याने चालक त्याचे वाहने दुसऱ्या बाजूने घेतात. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने अचानक वेगात वाहन आल्यास अपघात होतात. हा रोड आता समतल राहिला नाही. चालकाने बस आधी थांबविली असती, तर हा अपघात टळला असता. 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात