विद्यापीठ परिसरात पक्ष्यांसाठी लावले जलपात्र
By निशांत वानखेडे | Published: April 3, 2024 05:21 PM2024-04-03T17:21:04+5:302024-04-03T17:22:11+5:30
वाढत्या तापमानाने तीव्र उन्हाचा तडाखा मनुष्यासह पशुपक्षी यांना देखील सहन करावा लागतो.
निशांत वानखेडे,नागपूर : वाढत्या तापमानाने तीव्र उन्हाचा तडाखा मनुष्यासह पशुपक्षी यांना देखील सहन करावा लागतो. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही संवेदना मनात ठेवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या परिसरात पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्यात आले आहे. विद्यापीठाच्या भौतिकशस्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जलपात्र लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्याहस्ते जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात ठिकठिकाणी जलपात्र ठेवण्यात आले आहे. यावेळी येथील कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक, भौतिकशास्त्र विभाग रासेयो समन्वयक डॉ. संजय ढोबळे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातही जलपात्र लावण्यात आले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्यासह विभागातील रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.