सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:57 PM2018-04-24T21:57:03+5:302018-04-24T21:57:15+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. काणे यांनी त्यावेळी ही बाब लपवून ठेवून स्वत:च्या नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.

Accusation of infringement of moral responsibility on Siddharth Vinayak Kane | सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचा आरोप

सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचा आरोप

Next
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : परीक्षा नियंत्रक असताना वागले बेकायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. काणे यांनी त्यावेळी ही बाब लपवून ठेवून स्वत:च्या नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केले असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. डॉ. काणे १५ नोव्हेंबर २०१० ते १३ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक होते. त्या काळात काणे यांच्या मुलीने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची उन्हाळी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ यातील तरतुदीनुसार परीक्षा नियंत्रक किंवा परीक्षा संचालक विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे संरक्षक असतात. त्यामुळे काणे यांनी स्वत:ची मुलगी परीक्षा देणार आहे ही बाब लक्षात घेता परीक्षा कामापासून वेगळे व्हायला हवे होते किंवा सक्षम अधिकाऱ्याला त्याबाबत लेखी कळवायला पाहिजे होते. परंतु, काणे यांनी यापैकी काहीच केले नाही असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात मिश्रा यांनी कुलपतींकडे लेखी तक्रार केली होती. ती तक्रार फेटाळल्या गेल्यामुळे मिश्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काणे यांनी नैतिक जबाबदारीचे उल्लंघन केल्याचे जाहीर करण्यात यावे व त्यांना कुलगुरू पदावरून कमी करण्यात यावे अशी विनंती मिश्रा यांनी न्यायालयाला केली आहे.
कुलपतींना नोटीस
न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर कुलपती, विद्यापीठाचे कुलसचिव व डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी होईल.

Web Title: Accusation of infringement of moral responsibility on Siddharth Vinayak Kane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.