प्रियकराविरुद्ध बलात्काराचा आरोप :सीताबर्डीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:53 PM2019-04-20T23:53:35+5:302019-04-20T23:54:05+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला.

Accusation of rape against beloved: FIR registered in Sitabuldi | प्रियकराविरुद्ध बलात्काराचा आरोप :सीताबर्डीत गुन्हा दाखल

प्रियकराविरुद्ध बलात्काराचा आरोप :सीताबर्डीत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देलग्नास नकार देणे महागात पडले 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. आरिफ अब्दुल कादिर शेख (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे.
इतवारी बाजारात राहणारा आरिफ रामदासपेठेतील ट्रॅव्हल टॅग कारवथ कव्हर मोअर असिस्ट प्रा.लि. नामक कंपनीत काम करतो. याच कंपनीसोबत इन्शुरन्सचे काम करणाऱ्या महिलेसोबत (वय ३९) त्याची २०१७ मध्ये ओळख झाली; नंतर त्यांची मैत्री घनिष्ट झाली. कामाच्या निमित्ताने ते इकडे-तिकडे सोबत फिरू लागले. मे २०१७ मध्ये कामाच्या निमित्ताने ऑफिसमध्ये बोलवून आरिफने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. ते पिल्यानंतर गुंगीत असलेल्या महिलेवर आरिफने बलात्कार केला. बदनामीचा धाक दाखवून त्याने तिला या घटनेची वाच्यता करू नको म्हटले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिला वारंवार आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. महिलाही त्याच्यात आपला भावी पती शोधत होती. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून तो तिला टाळू लागला. तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Accusation of rape against beloved: FIR registered in Sitabuldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.