नागपुरातील आरोपी बिल्डर कोंडावार, देशपांडे फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:37 PM2020-07-27T21:37:13+5:302020-07-27T21:38:23+5:30

विकत घेतलेला भूखंड तीन वर्षात दुपट किमतीला परत घेऊ, असे हमीपत्र लिहून देणाऱ्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली. मात्र बिल्डर गोपाल कोंडावार आणि त्याचा साथीदार अजय देशपांडे अजूनही फरार आहे. त्यांचा अटकेतील साथीदार आरोपी रवी देशपांडे याचा पोलिसांनी २९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला आहे.

The accused builder Kondawar from Nagpur, Deshpande is absconding | नागपुरातील आरोपी बिल्डर कोंडावार, देशपांडे फरारच

नागपुरातील आरोपी बिल्डर कोंडावार, देशपांडे फरारच

Next
ठळक मुद्देफसवणूक प्रकरण : पोलिसांची शोधाशोध, अटकेतील आरोपीचा पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकत घेतलेला भूखंड तीन वर्षात दुपट किमतीला परत घेऊ, असे हमीपत्र लिहून देणाऱ्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली. मात्र बिल्डर गोपाल कोंडावार आणि त्याचा साथीदार अजय देशपांडे अजूनही फरार आहे. त्यांचा अटकेतील साथीदार आरोपी रवी देशपांडे याचा पोलिसांनी २९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला आहे.
फिर्यादी प्रतिभा नीलकमल महतो (रा. काटोल मार्ग, नर्मदा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बिल्डर रवी देशपांडे, गोपाल लक्ष्मण कोंडावार (रामदासपेठ) आणि अजय नारायणराव देशपांडे यांचे नागपूर जिल्ह्यातील मौजा मंगरूळ येथे ले-आऊट आहे. आरोपींनी २०१४ मध्ये फिर्यादी महतो दाम्पत्याला आमच्याजवळून भूखंड विकत घेतल्यास तीन वर्षांनंतर या भूखंडाची किमान दुप्पट किंमत होईल. तसे झाले नाही तर आम्ही तुम्हाला दुप्पट रक्कम देऊन हा भूखंड परत घेऊ, असे हमीपत्र लिहून दिले होते. आरोपी गोपाल कोंडावार, रवी देशपांडे आणि अजय देशपांडे यांच्यावर विश्वास ठेवून महतो दाम्पत्याने चार भूखंड विकत घेतले. त्याबदल्यात त्यांना ३३ लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे तीन वर्षे झाली. तेव्हा महतो दाम्पत्य आरोपी बिल्डरकडे गेले असता त्याने रक्कम दुप्पट देण्यास टाळाटाळ केली. चौकशी केली असता हे भूखंड आरोपी बिल्डरांनी दुसºया व्यक्तीला विकल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महतो यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. चौकशीनंतर या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलीस पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमर काळणगे यांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात शुक्रवारी रवी देशपांडेला अटक करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. आज पुन्हा न्यायालयाने त्याचा पीसीआर दोन दिवसांनी वाढवून दिला.

Web Title: The accused builder Kondawar from Nagpur, Deshpande is absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.