सीसीटीव्हीमुळे पाच लाखांच्या घरफोडीतील आरोपी जेरबंद

By योगेश पांडे | Published: September 26, 2023 04:41 PM2023-09-26T16:41:27+5:302023-09-26T16:41:45+5:30

पाचपावली पोलीस ठाण्यातील पथकाची कारवाई

Accused in house burglary worth Rs 5 lakh jailed due to CCTV | सीसीटीव्हीमुळे पाच लाखांच्या घरफोडीतील आरोपी जेरबंद

सीसीटीव्हीमुळे पाच लाखांच्या घरफोडीतील आरोपी जेरबंद

googlenewsNext

नागपूर : घरातील सर्व आरोपी बाहेरगावी गेल्याची संधी साधत आरोपींनी घरफोडी करत पाच लाखांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी दोन दिवसांतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत त्यांना अटक केली. पाचपावली पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.

गगनदीप हरबनसिंह नरेंद्र (३२,लष्करीबाग, भोसलेवाडी) हे २३ सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून नातेवाईकांसह बाहेरगावी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ९० हजार रोख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. नरेंद्र यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली.

याशिवाय तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून या घरफोडीत सक्षम प्रेमनाथ मोहेकर (२२, गोळीबार चौक) व सारंग विजय गौर (२२, हंसापुरी) यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून १ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Accused in house burglary worth Rs 5 lakh jailed due to CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.