आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: November 1, 2015 03:25 AM2015-11-01T03:25:28+5:302015-11-01T03:25:28+5:30

महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरींचा ...

The accused's bail application is rejected | आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Next

बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट चालविण्याचे प्रकरण
नागपूर : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरींचा आणि रबरी शिक्क्यांचा वापर करून जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचे मोठे रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
सुनील चंद्रभान रंगारी, असे आरोपीचे नाव आहे. तो या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. प्रकरण असे की, नायब तहसीलदार आभा विनय बोरकर यांना २२ सप्टेंबर २०१५ रोजी तहसील कार्यालय परिसरात योगेश गोपाल मारकंडे आणि संध्या रामचंद्र आवळे हे दोघे उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि रबरी शिक्के असलेले जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र जवळ बाळगताना आढळून आले होते. चौकशीत या दोघांनी हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाच्या आवारात वावरणाऱ्या ३० वर्षीय ऋषी नावाच्या इसमाने बनवून दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४६५, ४६८, ४७३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अरविंद नत्थू मेश्राम, सुनील रंगारी आणि कपिल चौधरी यांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर येथे भाड्याने खोली घेतली होती. या ठिकाणी ते हे प्रमाणपत्र तयार करीत होते.
या ठिकाणाहून संगणक, मोठ्या प्रमाणावर बनावट स्टॅम्प आणि प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली होती. सुनील रंगारी याने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज प्रकरण गंभीर असल्याने फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत आणि दीपेश पराते यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जमदडे हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The accused's bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.