लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्याना परिचारिकांना किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले.राज्यातील खासगी रुग्णालयातील परिचारिकांना किमान वेतन लागू करण्याबाबतचा प्रश्न सदस्य नागो गाणार, प्रा. अनिल सोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत सभापतींनी हे निर्देश दिलेत. किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यासाठी कामगार व आरोग्य विभागामार्फत संयुक्त मोहीम राबविणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली.राज्यात ३७ हजार खासगी रुग्णालये आहेत. किमान वेतन कायदा असूनही अनेक रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांना दोन हजार रुपये वेतन मिळत नसल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले. अनिल सोले म्ह्णाले, परिचारिका संघाने परिचारिकांचे वेतन निश्चित केले आहे. त्यानंतरही त्यांना नियमानुसार वेतन मिळत नाही. भाई जगताप म्हणाले, किमान वेतन कायदा आहे. त्यानुसार वेतन देणे बंधनकारक आहे. या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सदस्यांची आग्रही मागणी विचारात घेता सभापतींनी किमान वेतन न देणाऱ्या खासगी रु ग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
परिचारिकांना किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:20 AM
राज्यातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्याना परिचारिकांना किमान वेतन न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी राज्य सरकारला दिले.
ठळक मुद्देसभापतींचे निर्देश : कामगार व आरोग्य विभाग संयुक्त मोहीम राबविणार