नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्या अशा १०२ लोकांवर कारवाई करून ५४१०० रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला.
रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आदी ठिकाणी कचरा टाकल्या प्रकरणी ७ लोकांवर कारवाई करण्यात आली. १० दुकानदारावर रस्ता, फुटपाथ, मोकळी येथे कचरा टाकल्याने कारवाई करण्यात आली. एका शैक्षणिक संस्थेवरही रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. दोन हॉटेलवाल्यांवर दंडात्मक कारवाई करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज अडवून ठेवल्या प्रकरणी ११ लोकांवर कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ६ जणांवर कारवाई
प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ६ लोकांवर कारवाई करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत लक्ष्मीनगर झोन येथील श्री कमलेश अपार्टमेंट, नेहरूनगर झोन येथील मे. गिरीधर कंन्स्ट्रक्शन्स, मंगळवारी झोन येथील मे. भाव्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला.