मंगल कार्यालयासोबतच वाईन शॉपवर कारवाई()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:12 AM2021-02-21T04:12:08+5:302021-02-21T04:12:08+5:30
१०५ मंगल कार्यालयांची तपासणी, ७ वर आकारला दंड लोकमत न्यूज नेटकर्क नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता ...
१०५ मंगल कार्यालयांची तपासणी, ७ वर आकारला दंड
लोकमत न्यूज नेटकर्क
नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मंगल कार्यालये, लॉन सभागृह यासोबतच आता मॉल, हॉटेल, वाईन शॉपची तपासणी सुरू केली आहे. शनिवारी १०५ मंगल कार्यालये, लॉन, सभागृह, दुकाने, प्रतिष्ठाने यांची तपासणी करण्यात आली. नियमाचे उल्लघन करणाऱ्या ७ जणांवर दंड आकारून ८२ हजार वसूल करण्यात आले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोविड दिशा-निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार उपद्रव शोध पथकाला दिले आहे. त्यानुसार पथकामार्फत १६ फेब्रुवारीपासून मंगल कार्यालय, लॉन,सभागृह यांच्यावर कारवाई केली जात आहे. शनिवारी धंतोली झोनच्या पथकाने नक्षत्र सभागृहावर १५ हजार, कुकडे ले -आऊट येथील पवार विद्यार्थी गृहावर ५ हजार, गांधीबाग झोनच्या पथकाने जैन भवनवर १० हजार, तुळशीबाग येथील राजे तेजसिंराव भोसले सभागृहावर १० हजार, आसीनगर झोनमधील ऑटोमोटीव्ह चौकातील गोतरा लॉन वर १५ हजार, मंगळवारी झोनमधील जाफर नगर येथील न्यू पांडे लॉनवर २५ हजार, कोराडी रोडवरील फारस चौक येथील नुपूर वॉईनवर सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याने २ हजार दंड आकारण्यात आला.
...
२७ मंगल कार्यालय, लॉनवर कारवाई
शनिवारी लक्ष्मीनगर झोनमध्ये ३४, धरमपेठ ८, हनुमाननगर मध्ये ७, धंतोली १३, नेहरुनगर झोनमध्ये ९ , गांधीबाग ८, सतरंजीपुरा झोनमध्ये ३, लकडगंज मध्ये ७, आशीनगर झोनमध्ये ६ तर मंगळवारी झोनमध्ये १० मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींची तपासणी करण्यात आली. शोध पथकाने आतापर्यंत ३७२ ठिकाणांची तपासणी केली. यात २७ मंगल कार्यालय, लॉन, सभागृह व प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली.