लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : शहरासह तालुक्यात रविवारी (दि. २१) करण्यात आलेल्या काेराेना टेस्टमध्ये २४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. काेराेना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
नव्याने आढळून आलेल्या २४ रुग्णांमध्ये २१ रुग्ण काटाेल शहरातील असून, तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील रुग्णांमध्ये पंचवटी येथील चार, जानकीनगर, आययुडीपी व धंतोली येथील प्रत्येकी तीन, गळपुरा व सरस्वती नगरातील प्रत्येकी दाेन तर पोहकार लेआऊट,नबीरा लेआऊट, लक्ष्मीनगर, खोजा लेआऊट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. शिवाय, तालुक्यातील काेंढाळी येथेही तीन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (दि. २०) तालुक्यात २५ रुग्ण तसेच काही शिक्षक काेराेना संक्रमित आढळून आल्याने खळबळ उडाली हाेती. सध्या शाळा सुरू असल्याने शिक्षकांच्याही टेस्ट सुरू आहेत. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.