राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:52 AM2022-12-22T09:52:35+5:302022-12-22T09:53:20+5:30
भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत
नागपूर : खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करून असे खोटे आरोप होताहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्यात आले. कर्नाटक निवडणुका येताच सीमावाद तापविण्यात येत आहे. तसाच प्रकार 'एयू'बाबत आहे.
मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिल्या जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीये, असे रोहित पवार म्हणाले. मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.