ऑनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील नैसर्गिक आपत्ती विचारात घेता डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश देण्यात येईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. सविस्तर सूचना, पडताळणी केंद्रांची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५ टक्के व मागासवर्गीय ४४.५ टक्के), प्रवेश अर्ज २० ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन भरुन मूळ प्रमाणपत्रे २१ ऑगस्टपर्यंत पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करणे व ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्गकरिता २०० रुपये आणि मागासवर्गीय संवर्गाकरिता १०० रुपये आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पूर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जाऊन अर्ज ऑनलाईन अस्रस्र१ङ्म५ी केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही, असे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. रत्ना गुजर यांनी म्हटले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी २० पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:20 AM