औषधांचा काळाबाजार व साठेबाजांविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:14+5:302021-04-14T04:08:14+5:30

व्हीटीएची मागणी : औषधांच्या काळाबाजाराने नागरिक त्रस्त नागपूर : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ...

Against drug black market and stockists | औषधांचा काळाबाजार व साठेबाजांविरुद्ध

औषधांचा काळाबाजार व साठेबाजांविरुद्ध

Next

व्हीटीएची मागणी : औषधांच्या काळाबाजाराने नागरिक त्रस्त

नागपूर : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयात बेड, डॉक्टर्स आणि संबंधित कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तर दुसरीकडे नागरिकांना रेमडेसिविर यासारख्या जीवनावश्यक औषधांची कमतरता भासत आहे. त्या कारणाने रुग्णांना तीव्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा गंभीर स्थितीत औषधांचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कायदा बनण्याची मागणी विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशनने (व्हीटीए) केली आहे.

कठोर कायदा करावा, अशी मागणी व्हीटीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेंद्र टोपे यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे. व्हीटीएचे अध्यक्ष श्रवणकुमार मालू म्हणाले की, कठीणसमयी जीवनरक्षक औषधांच्या कमतरतेने कोरोना रुग्णांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनातर्फे औषधांची उपलब्धता आणि विक्रीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, रेमडेसिविर यासारख्या जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्याचा हवाला देऊन अनेकदा नागरिकांना अशी औषधे काळ्या बाजारातून जास्त किमतीत खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाध्य केले जाते. त्याची २० हजारांपर्यंत किंमत मागितली जाते. अशा परिस्थितीत आधीच त्रस्त आणि चिंतित असलेल्या नागरिकांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार आणि जमाखोरी करण्यावर नियंत्रण आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी समयबद्ध निर्णयासह कठोर कायदा बनविण्याची मागणी व्हीटीएने केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.

Web Title: Against drug black market and stockists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.