ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:07 AM2021-06-24T04:07:04+5:302021-06-24T04:07:04+5:30

सुधीर मुनगंटीवार : २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात ...

Against the state government for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारविरुद्ध

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारविरुद्ध

Next

सुधीर मुनगंटीवार : २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून ओबीसींवर राजकीय अत्याचार करणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध भाजपने एल्गार पुकारला आहे, असे भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बुधवारी पत्रपरिषदेत सांगितले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी येत्या २६ जून रोजी भाजपने चक्का जाम आंदोलन आयोजित केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात या आंदोलनाचे नेतृत्व करतील. याबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार यांनी यावेळी आघाडी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, आघाडी सरकारचा जन्मच बेईमानीतून झाला आहे. आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ना मराठा समाज बांधवांचे आरक्षण टिकू शकले ना ओबीसींचे आरक्षण टिकू शकले. इतकेच नव्हे तर मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील हक्काचे आरक्षण सुद्धा हे सरकार वाचवू शकले नाही. कुंभकर्ण हा सहा महिने झोपायचा पण हे सरकार बारा महिनेही झोपलेलेच असते, अशी टीकाही त्यांनी केली.

ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून पावसाळी अधिवेशनाचा कालावधी सुद्धा सरकारने दोन दिवसांचा केला. तीन पक्षाचे सरकार म्हणून तीन दिवसाचे अधिवेशन ठेवले असते तरी समजले असते, पण हे सरकार कॉंग्रेसला मोजतच नाही, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी यावेळी काढला.

पत्रपरिषदेला खा. विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ मिलिंद माने, धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.

बॉक्स

भाजप सर्व जागी ओबीसी उमेदवार उभे करणार

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने १९ जुलै रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकावर स्थगिती आणावी. यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी भाजपची भूमिका आहे. जर या निवडणुका स्थगित झाल्या नाही तर या निवडणुकीतील सर्व जागांवर भाजपतर्फे ओबीसी उमेदवार उभे केले जातील, असे मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: Against the state government for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.