‘एम्स’ची ओपीडी शनिवारपासून रुग्णसेवेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:23 PM2019-09-05T22:23:04+5:302019-09-05T22:24:02+5:30

बहुप्रतिक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होत आहे. याचे डिजिटल उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

'AIIMS' OPD has been in patient service since Saturday | ‘एम्स’ची ओपीडी शनिवारपासून रुग्णसेवेत 

‘एम्स’ची ओपीडी शनिवारपासून रुग्णसेवेत 

Next
ठळक मुद्देतूर्तास ‘डे-केअर सेंटर’ : तीन महिन्यानंतर १०० खाटांचा वॉर्ड

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बहुप्रतिक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होत आहे. याचे डिजिटल उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुरुवातीला ‘डे-केअर सेंटर’ असून, महिन्याभरात २० खाटा आणि पुढील तीन महिन्यात १०० खाटांची सोय ‘ओपीडी’मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती ‘एम्स’च्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
मिहान येथे २५० एकरमध्ये ‘एम्स’ची इमारत उभारली जात आहे. या वर्षी ‘एमबीबीएस’ची दुसऱ्या बॅचच्या १०० विद्यार्थ्यांना याच इमारतीतून शिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीपासूनच ‘एम्स’ एमबीबीएसचे वर्ग सुरू झाले आहे. परंतु इमारतीचे बांधकाम अपुरे असल्याने मेडिकल कॉलेजमध्येच ५० विद्यार्थ्यांच्या निवासाची व शिक्षणाची सोय करण्यात आली होती. लवकरच यांचेही वर्ग मिहानमधून सुरू होणार आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. दत्ता म्हणाल्या, मेट्रोच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मार्गाचे लोकार्पण शनिवार ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे, याच कार्यक्रमात ‘एम्स’च्या ‘ओपीडी’चेही डिजिटल उद्घाटनही होणार आहे. ही ओपीडी शनिवारनंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवेत असेल. येथे उपचारासोबतच काही तपासण्या केल्या जातील. परंतु ही ‘डे-केअर’ सेवा असेल. महिन्याभरानंतर २० खाटा आणि साधारण तीन महिन्यानंतर १०० खाटा ‘ओपीडी’मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. या वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांमधून ९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या निवासाची व शिक्षणाचीही सोय मिहान येथेच करण्यात आली आहे. लवकरच मेडिकलमध्ये शिक्षण घेणाºया ५० विद्यार्थ्यांच्या निवासाचीही सोय मिहानमध्ये केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: 'AIIMS' OPD has been in patient service since Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.