कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:32 PM2020-05-20T21:32:45+5:302020-05-20T21:39:06+5:30

सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.

All avenues for transporting vegetables to the cotton market are closed | कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

Next
ठळक मुद्देमार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंदच : पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची अडतियांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मोरोणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. अडतियांची मागणी आणि बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणारे ८२ अडतिये आहेत. उर्वरित अडतिये कळमन्यात स्थलांतरित झाले आहेत. मनपाने व्यवसायासाठी यादी तयार केली तेव्हा कळमन्यातील अडतिये आणि कॉटन मार्केटलगतचे आलू-कांद्याच्या चिल्लर व्यापाऱ्यांना समाविष्ट केले. मनपाने २४० जणांची यादी केली आणि ४० जणांना एका दिवशी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारी व्यवसाय करणाऱ्याचा नंबर दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी लागणार होता. पूर्वीच बाजार ५० दिवस बंद राहिल्याने अडतिया आणि व्यापाऱ्यां ना आर्थिक फटका बसला आहे. मनपाच्या या नियमामुळे येथील व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याचा निषेध म्हणून मार्केट बंद केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
भाज्याच्या गाड्या आत नेण्यास मनाई
मार्केटच्या आत भाज्याच्या गाड्या नेण्याचे सर्व मार्ग बुधवारी टिनांनी बंद केले आहेत. त्यामुळे बाजाराबाहेर गाड्या उभ्या करून भाज्यांचे प्रत्येक पोते आत नेणे शक्य नाही. अडतिया, व्यापाऱ्यां नी व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी भाज्यांची विक्री करू नये, असे धोरण मनपाने अवलंबविले आहे. या पद्धतीने व्यवसाय होणार नाही. गर्दी होऊ नये, याकरिता असोसिएशन सज्ज आहे. त्याच प्रमाणात मनपाच्या कर्मचाऱ्यां नाही दक्ष राहावे. शहरात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मनपाचे हेच धोरण राहिले तर शेतकरी नागपुरात भाज्या आणणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापत्या उन्हाळ्यात जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होणार आहे. पूर्वीप्रमाणे मार्केट सुरू ठेवण्यास शहराला भाज्यांचा सुरळीत पुरवठा होईल आणि याकरिता मनपा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे महाजन यांनी सांगितले.

Web Title: All avenues for transporting vegetables to the cotton market are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.