लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यांनी जर हे आरोप सभागृहाबाहेर केले असते तर त्यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकला असता, असा दावा गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला.गुट्टे म्हणाले, १५ दिवसांपूर्वी गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही माझ्यावर हेच आरोप लावले होते. त्याकरिता त्यांना १५ दिवसांत माफी मागण्यासाठी नोटीस पाठविली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचाअब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. ते म्हणाले, गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी, सुनील हायटेक इंजिनिअर्स आणि समूहाच्या इतर कंपन्यांनी ५,४६२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला होता. कर्जाचा तपशील देताना गुट्टे यांनी सांगितले की, गंगाखेड साखर अॅण्ड ऊर्जा लिमिटेडवर १४६६ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा मुंडे यांनी केला होता. पण प्रत्यक्षात कारखान्यावर ३६१.४७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यात ४१.४७ कोटींची बँक गॅरंटी (बीजी) आणि हमीपत्र (एलसी) आहे.त्याचप्रमाणे सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडवर १२२.१० कोटींचे कर्ज, ४२५.७१ कोटींची कॅश क्रेडिट, १५०३.०४ कोटींची एलसी व बँक गॅरंटी अशी ही आकडेवारी २०५० कोटी ८५ लाख रुपये एवढी आहे. पण मुंडे यांनी ही थकीत कर्जाची आकडेवारी फुगवून २४१३ कोटी ३२ लाख एवढी सांगितली. याचप्रमाणे सीम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाबतीत मुंडे यांनी सांगितलेल्या ८६.६५ कोटी रुपयांच्या तुलनेत कर्जाची रक्कम १.६५ कोटी रुपये आहे. त्यात सीसी मर्यादा, एलसी व बँक गॅरंटी मर्यादा असे एकूण ६९.६७ कोटी रुपये असल्याचे गुट्टे यांनी स्पष्ट केले.
माझ्याविरुद्ध आरोप राजकीय वैमनस्यातून : रत्नाकर गुट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:34 AM
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यांनी जर हे आरोप सभागृहाबाहेर केले असते तर त्यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकला असता, असा दावा गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्दे ..तर धनंजय मुंडे यांच्यावर दावा ठोकला असता