समता प्रतिष्ठानमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप कपोलकल्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:41+5:302021-03-10T04:09:41+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप कपोलकल्पित आणि खोटे आहेत, असे मत प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप कपोलकल्पित आणि खोटे आहेत, असे मत प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
उमेश नंदेश्वर, तुषार सूर्यवंशी, नागेश वाहुरवाघ व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वाहूरवाघ यांनी सांगितले, सीएजीमार्फत ऑडिटर नेमले होते. सीएजीने केलेल्या निर्धारित कालावधीच्या लेखापरीक्षणात कुठल्याही प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार न झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून कार्यालयास १५ कोटी ८४ लाख ४० हजार रुपये प्राप्त झाले. यापैकी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १५ कोटी ८१ लाख ३२ हजार २१० रुपये खर्च झाले आहेत. यातील तीन कोटी निधी बीओडी व शासनाने निर्देशित केलेल्या कार्यक्रमाकरिता प्रादेशिक उपयुक्त, शासकीय आयुक्त व इतर यंत्रणेशी वळविण्यात आले आहेत. या सर्व बाबींची तपासणी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमार्फत करण्यात आलेली आहे, पण अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही.
मात्र विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्यायमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवली. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ११ कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत निलंबित केले आहे. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची भावना नागेश वाहूरवाघ यांनी व्यक्त केली.