नरेश डोंगरेनागपूर - उच्चशिक्षित मंडळी हत्येसारखे गंभीर गुन्हे करत नाही, हा समज सपशेल खोटा आहे. उपराजधानीत गेल्या १० वर्षांत हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील १३८ आरोपी चांगले शिकले सवरलेले आहेत. एमबीबीएस, पीएच.डी आणि लॉ केलेल्यांचाही यात समावेश आहे. नागपूर पोलिसांकडून करवून घेण्यात आलेल्या एका अभ्यास पाहणीनंतरच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांकडून आटोकाट प्रयत्न करूनही हत्येचे गुन्हे थांबताना दिसत नाहीत. छोट्या छोट्या कारणामुळे घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांचा समावेश असतो तसे नवखे गुन्हेगारही दिसून येतात. नागपुरातील हत्येच्या गुन्ह्यांची तुलना अन् चर्चा एनसीआरबीच्या माध्यमातून देशातील विविध प्रांताशी अन् महानगराशी केली जाते. यामुळे नागपूरला 'क्राईम कॅपिटल' असेही संबोधले जाते. या एकूणच प्रकारामुळे राज्य सरकार अन् खास करून गृहमंत्रालय कमालीचे अस्वस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर, १९ ऑक्टोबर २०२१ ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूरात शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नागपुरातील बॉडी अफेन्स, खास करून हत्येच्या गुन्ह्यांची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. सोबतच हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींची शैक्षणिक पात्रताही चचेर्ला आली. ती चक्रावून सोडणारी आहे.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपुरातील हत्येच्या मालिकेची कारणं जाणून घेण्यासाठी आणि ही दुष्टमालिका थांबविण्यासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीशी एक सामंजस्य करार केला. लॉ युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ आणि पोलीस उपायुक्तांसह काही अधिकारी या समितीत होते. त्यांनी गेल्या १० वर्षांतील हत्येच्या गुन्ह्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. या गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्या आरोपींनी कोणत्या कारणामुळे हा गंभीर गुन्हा केला, आरोपींची मानसिकता, वय आणि शैक्षणिक पात्रता याचीही नोंद या अभ्यासात केली. तो अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. यात उजेडात आलेल्या पैलूंमध्ये सर्वात धक्कादायक पैलू आहे, आरोपींच्या शैक्षणिक पात्रतेचा. १०८६ आरोपींमध्ये तब्बल १३८ आरोपी शिक्षित-उच्चशिक्षित आणि अतिउच्चशिक्षित आहेत. ज्यात पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीबीएस, लॉ आणि पीएच.डी. केलेल्या आरोपींचाही समावेश आहे. या आकडेवारीच्या तुलनेत कोणतेही शिक्षण न घेतलेल्या अर्थात पूर्णता अशिक्षित असलेल्या आरोपींची संख्या (कमी) ८३ आहे, हे विशेष.---हत्येच्या आरोपातील आरोपींची शैक्षणिक पात्रता आणि संख्याआयटीआय - पॉलिटेक्निक - ८इंजिनिअरिंग - ३अंडरग्रॅज्युएट - ११०पोस्ट ग्रॅज्युएट - १४पीएच.डी. - १लॉ - १एमबीबीएस - १------------------