बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन मनपा शाळेत ७५वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा झाला. नगरसेविका रूपा राय, मुख्याध्यापक अभ्यंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ज्योती कोहळे, गोपालन, वैशाली मॅडम, डॉ. वसुधा वैद्य, निकोलस उपस्थित होते.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यदिनी ब्रास बॅण्डद्वारे देशभक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंगलदीप बॅण्डचे प्रमुख लहानू इंगळे व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सुयोग बॅण्ड पथक प्रमुख अजय दुबे यांचा सत्कार केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पतंजली योग समिती
पतंजली योग समिती, संत ज्ञानेश्वर उद्यान व ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रयनगरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. रघुजीनगर येथील पं. दीनदयाल उपाध्याय उद्यानात झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी अ.भा. अंनिसचे हरिश देशमुख, ज्येष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग, सुरेश धुंडे, प्रतिभा सावळकर, उर्मिला जुनारकर, गुलाबराव उमाठे, प्रभाकर सावळकर, पद्माकर आगरकर, श्रीराम दुरगकर, भास्कर राघोर्ते, सुधाकर शर्मा उपस्थित होते.
नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघ
महासंघाच्या वतीने रामनगर, मंगलमूर्ती चौक, हिंगरा रोड टी पॉईंट, गांधीबाग, न्यू सुभेदार लेआऊट आदी शाखांमध्ये स्वातंत्र्योत्सव साजरा झाला. यावेळी मोहनदास नायडू, चरणदास वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मोहन बावणे, कैलाश श्रीपवार, इस्त्राईल खान, अजय उके, खोरेंद्र सोनिक, देवेंद्र बागडे, नारायण भांगे, देवव्रत विश्वास, संजय जिचकार, मो. अतहर खान आदी उपस्थित होते.