Nagpur | अनियंत्रित तवेरा कार मध्यरात्री अंबाझरी टी पॉइंटवर उलटली अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 12:50 PM2022-07-27T12:50:45+5:302022-07-27T12:53:50+5:30

कारमधील तरुण-तरुणी पळून गेले, मद्यधुंद असल्याचा अंदाज

An uncontrolled Tavera car overturned at Ambazari T Point in the middle of the night; | Nagpur | अनियंत्रित तवेरा कार मध्यरात्री अंबाझरी टी पॉइंटवर उलटली अन्..

Nagpur | अनियंत्रित तवेरा कार मध्यरात्री अंबाझरी टी पॉइंटवर उलटली अन्..

googlenewsNext

नागपूर : अनियंत्रित तवेरा कार अंबाझरी टी पाइंटजवळ उलटली. या अपघातानंतर कारचालक, तसेच एक तरुण आणि तरुणी कारमधून बाहेर निघाले आणि पळून गेले. मंगळवारी उशिरा रात्री ही अपघाताची घटना घडली.

मंगळवारी रात्री ११.४५ ते १२ वाजेच्या सुमारास हिंगणा टी पॉइंटकडून भरधाव तवेरा कार  (एमएच ४० ए ८२७१) अंबाझरी टी पॉइंटकडे जात होती. वेग जास्त असल्याने वळणावर ही कार अनियंत्रित झाली आणि स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून काही अंतरावर डिव्हायडरला धडकून पलटली. अपघातामुळे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील मंडळी धावली. दरम्यान, कारमधून एक तरुणी, तसेच कारचालकासह दोघे (एकूण तिघे) कसेबसे बाहेर निघाले आणि त्यांनी तेथून धूम ठोकली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांचे गस्तीपथक तेथे धावले. कारचालक किंवा मालक कुणीच तेथे नव्हते. त्यांनी अपघातस्थळी असलेल्यांना विचारणा केली असता, कारमधून तरुणीसह तिघे बाहेर पडले आणि डॉक्टरकडे जातो, असे सांगून पळून गेले. बराच वेळ होऊनही त्यांनी पोलिसांना फोनवरूनही माहिती देण्याची तसदी घेतली नाही. त्यांचे घटनास्थळावरून निघून जातानाचे वर्तन बघता ते नशेत असावेत, असा अंदाज त्यांना पाहणाऱ्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला.

क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्याचे प्रयत्न

पोलिसांनी उलटलेली कार रस्त्यावर आणण्यासाठी क्रेन बोलवली. मध्यरात्रीपर्यंत अपघातग्रस्त कार काढण्याचे काम सुरू होते. कारच्या क्रमांकावरून पोलीस कारमालकाचा आणि अपघाताच्या वेळी कारमध्ये कोण होते, त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: An uncontrolled Tavera car overturned at Ambazari T Point in the middle of the night;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.