नागपूर : बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३२ वाजता नागपूररेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर घडली.
उमा भारती यांचे येथील रेल्वे स्थानकावल दुपारी १२.२० वाजता आगमन झाले. प्लॅटफार्मवर उतरून त्या बाजूलाच बंद असलेल्या एस्केलेटरच्या पायऱ्या चढून जात होत्या. काही पायºया चढून झाल्यावर एस्केलेटर अचानक सुरु झाले. त्यामुळे त्या घाबरल्या परंतु त्यांनी लगेच तोल सांभाळला. त्यानंतर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली.बुक स्टॉलवाल्याने केले एस्केलेटर सुरूउमा भारती चढून जात असलेले एस्केलेटर त्या येण्यापूर्वी सुरू होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बंद केले. एस्केलेटरवर त्या काही पावले चालून गेल्यानंतर बाजूला असलेल्या एका बुक स्टॉलवाल्याला उमा भारती जात असून एस्केलेटर बंद असल्याचे दिसले आणि त्याने बटन दाबून ते सुरु केले, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.स्पॉडिलायटीसच्या त्रासामुळे लागला झटकाउमा भारती यांना स्पॉंडिलायटीसचा त्रास आहे. बंद एस्केलेटर अचानक सुरु झाल्याने त्यांच्या पाठीला झटका लागला. यामुळे त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली.