नागपूर : आठ दिवसांपूर्वी पळवून नेण्यात आलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला पुन्हा मातृछत्र मिळवून देण्यात महिला व बाल कल्याण समितीला रविवारी मातृदिनीच यश आले आहे. मातृभेटीसाठी आसुसेल्या चिमुकलीने अचानक ती समोर येताच तिला घट्ट मिठी मारली. शहरातील घडलेल्या या हृदयद्रावक प्रसंगाने अनेकांचे डोळे पाणावली.लक्ष्मी ठाकूर असे या चिमुकलीचे नाव आहे. दिघोरी परिसरात आजारी आईसोबत ती उघड्यावर राहात होती. याचा गैरफायदा घेत आठ दिवसांपूर्वी एका महिलेने चिमुकलीला पळवून नेले. मात्र बैतुल पोलिसांनी सूत्र हलवित तिला ताब्यात घेतले.चिमुकलीने ती नागपूरला राहात असल्याचे सांगितले. त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण समितीशी संपर्क साधून शनिवारी बैतुल पोलीस लक्ष्मीला नागपुरात घेऊन आले. जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिला श्रद्धानंद अनाथालयात दाखल नेले.दरम्यान मातृदिनी तिच्या आईची भेट घडवून देण्याचे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी ठरविले. मोठा ताजबाग परिसरात राहत असल्याचे लक्ष्मी सांगत होती. त्यामुळे ते दोघे सकाळीच श्रद्धानंद अनाथालयात पोहचले. अनाथालयाचे काळजीवाहक सुभाष वाघमारे व रेखा वाघमारे यांना सोबत घेऊन मुलीसह ते मोठा ताजबाग परिसरात पोहचले. तिची आई दिघोरी परिसरातील प्रगती सांस्कृतिक भवनाच्या मागील उद्यानात बसली होती. त्या चिमुकलीला आई दिसताच ती आईच्या कुशीत शिरून रडत सुटली.दोघी वसतिगृहातशोध सुरू असताना लक्ष्मीची आई सापडल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना दिली. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर, हुडकेश्वर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलिसांच्या मदतीने या दोघींना प्रियदर्शिनी वसतिगृहात दाखल करण्यात आले.
...अन् अखेर मातृदिनीच ती परतली ‘माये’च्या कुशीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 1:15 AM