...अन् नागपुरातील प्रियदर्शनी शाळा ७ मिनिटात केली खाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:39 AM2018-12-07T00:39:43+5:302018-12-07T00:40:24+5:30
विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
महापालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मॉक ड्रील, इव्हेकेशन ड्रील पार पडली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या चमू , कम्युनिकेशन चमू, फायर चमू, मेडिकल पथक, बचाव पथक, शोध पथक, ट्रान्सपोर्ट पथक, मीडिया चमू व मॅनेजमेंट चमू तयार करण्यात आल्या. त्यांना सविस्तर माहिती देऊ न कवायती करून घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आग लागल्यास बचाव करण्याबाबतची माहिती देण्यात आली. या ड्रीलमध्ये लकडगंज स्थानकाचे प्रभारी स्थानाधिकारी मोहन गुडधे, उपस्थानाधिकारी राजेंद्र डकरे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहायक स्थानाधिकारी केशव कोठे, सुनील राऊ त तसेच शाळेच्या प्राचार्य नीलिमा जैन, शिक्षक, कर्मचारी व अग्निशमन विभागातील जवान सहभागी झाले होते.