आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आजवर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती.अहिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते सध्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध व्यापारी संघटना, प्रतिष्ठाने, क्रीडा व सामाजिक संस्था, संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. अहिरकर यांना नियुक्तीपत्र देतेवेळी माजी आ. दीनानाथ पडोळे व महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी वाढत असल्याचे पाहून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची तर माजी मंत्री बंग यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी नियमित कामकाज पाहण्यासाठी कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती. महापालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अनिल देशमुख यांनी २४ मार्च २०१७ रोजी शरद पवार यांना पत्र पाठवून शहर अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची तसेच अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. शिवाय गेल्या महिन्यात अजित पवार व सुनील तटकरे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांच्या बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. या वेळी नागपूरच्या बैठकीत शहरातील काम संथ असल्याची नाराजी काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली होती. काम करणारयांना संधी देण्याची मागणी केली होती. या मागणीची पक्षाने दखल घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदीअनिल अहिरकरआॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आजवर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती.अहिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते सध्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध व्यापारी संघटना, प्रतिष्ठाने, क्रीडा व सामाजिक संस्था, संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. अहिरकर यांना नियुक्तीपत्र देतेवेळी माजी आ. दीनानाथ पडोळे व महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी वाढत असल्याचे पाहून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची तर माजी मंत्री बंग यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी नियमित कामकाज पाहण्यासाठी कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती. महापालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अनिल देशमुख यांनी २४ मार्च २०१७ रोजी शरद पवार यांना पत्र पाठवून शहर अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची तसेच अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. शिवाय गेल्या महिन्यात अजित पवार व सुनील तटकरे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांच्या बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. या वेळी नागपूरच्या बैठकीत शहरातील काम संथ असल्याची नाराजी काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली होती. काम करणाºयांना संधी देण्याची मागणी केली होती. या मागणीची पक्षाने दखल घेतली आहे.