पं.नेहरूंची प्रतिमा मलीन करू पाहणाºयांना उत्तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:33 AM2017-11-15T00:33:03+5:302017-11-15T00:33:17+5:30
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना सर्व वैभवाचा त्याग केला. देशातील सर्वात मोठ्या कारागृहात कारावास भोगला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना सर्व वैभवाचा त्याग केला. देशातील सर्वात मोठ्या कारागृहात कारावास भोगला. पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात सलोख्याचे संबंध होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरदार पटेल यांनी स्वत:च नेहरू यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत नेहरू सहभागी झाले नव्हते, असा आरोप भाजपाचे नेते करतात. पण नेहरू यांनी पहिला खांदा दिला. पंडित नेहरूंची प्रतिमा मलीन करू पाहणाºयांना इतिहासाचे दाखले देऊन उत्तर द्या, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.
शहर काँग्रेसतर्फे देवडिया काँग्रेस भवनात पंडित नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुत्तेमवार यांनी नेहरूंच्या कार्यावर प्रकाश टाकला. विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करून जनमानसात प्रतिमा मलिन करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. मात्र, यात ते यशस्वी होणार नाहीत. काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता काँग्रेस नेत्यांनी केलेली कामे जनतेसमोर मांडेल. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९ नोव्हेंबर रोजी नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विशाल मुत्तेमवार, अॅड. अभिजिंत वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ते अतुल लोंढे, यांनीही पंडित नेहरूंच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सेवादलाचे प्रमुख रामगोविंद खोब्रागडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, रामेश्वर खडसे, प्रशांत धवड, राजू व्यास, बंडोपंत टेंभूर्णे, राजेश कुंभलकर, रवि गाडगे पाटील, जयंत लुटे, अॅड. अक्षय समर्थ, रमण पैगवार, दिनेश बानाबाकोडे, अण्णाजी राऊत, प्रशांत ठाकरे, अमील पाठक, विजय राऊत, प्रशांत ढाकणे, पंकज लोणारे, पंकज निघोट, आकाश तायवाडे, बॉबी दहीवले, प्रकाश बांते, सुनीता ढोले, अर्चना बडोले आदी उपस्थित होते. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. नागपूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विवेक निकोसे व काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे यांच्यातर्फे पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.