लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे आता काही ठराविक लक्षण राहिले नाही. वैद्यक शास्त्राने कोरोनाची अनेक लक्षणे सांगितलेली आहे. अनेकांना ते लक्षण आढळल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते कोरोनातून बरेही झाले असतील, असाही कयास लावला जात आहे. अशा बऱ्या झालेल्या लोकांचा शोध सरकार घेत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अॅण्टीबॉडी टेस्ट घेणे सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील जवळपास ७० ते ८० लोकांच्या शनिवारी अॅण्टीबॉडी टेस्ट झाल्याची माहिती आहे.प्लाझ्मा थेरपी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी सकारात्मक ठरत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या शरीरातील अॅण्टीबॉडी प्लाझ्माच्या रुपात घेण्यात येतात. देशभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा आवश्यकता सरकारला भासणार आहे. वैद्यकशास्त्राने कोरोनाची वेगवेगळी लक्षण असल्याचे सांगितले आहे. अनेकजण किरकोळ लक्षण असल्यामुळे दुर्लक्ष केल्याने कोरोनातून बाहेरही पडले आहे. त्यामुळे अशा लोकांचा शोध घेण्यासाठी अॅण्टीबॉडी टेस्ट केल्या जात आहे. सरकारने त्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आल्या आहे. नेमके यामागचे कारण कळू शकले नाही. पण या माध्यमातून सरकार स्वत:चा प्लाझ्मा बँक तयार करण्याचा मानस बाळगत असण्याची शक्यता आहे.
सरकारने सुरू केल्यात अॅण्टीबॉडी टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:13 AM
कोरोनाचे आता काही ठराविक लक्षण राहिले नाही. वैद्यक शास्त्राने कोरोनाची अनेक लक्षणे सांगितलेली आहे. अनेकांना ते लक्षण आढळल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते कोरोनातून बरेही झाले असतील, असाही कयास लावला जात आहे. अशा बऱ्या झालेल्या लोकांचा शोध सरकार घेत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अॅण्टीबॉडी टेस्ट घेणे सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील जवळपास ७० ते ८० लोकांच्या शनिवारी अॅण्टीबॉडी टेस्ट झाल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा झाल्या तपासण्या