पॅनकार्ड क्लबविराेधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:17+5:302021-02-10T04:09:17+5:30

दुचाकीच्या धडकेने वृद्धेचे निधन नागपूर : दुचाकीच्या धडकेने अज्ञात वृद्ध महिलेचे निधन झाले. ही ६० वर्षीय महिला साेमवारी सकाळी ...

Appeal to file a complaint against PAN Card Club | पॅनकार्ड क्लबविराेधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन

पॅनकार्ड क्लबविराेधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन

Next

दुचाकीच्या धडकेने वृद्धेचे निधन

नागपूर : दुचाकीच्या धडकेने अज्ञात वृद्ध महिलेचे निधन झाले. ही ६० वर्षीय महिला साेमवारी सकाळी टेलिफाेन एक्स्चेंज चाैकातून जात हाेती. यादरम्यान अज्ञात दुचाकीस्वाराने तिला धडक दिली. मेयाे रुग्णालयात नेल्यानंतर डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. लकडगंज पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविराेधात गुन्हा दाखल केला.

परिवहन वाहन चोराला अटक

नागपूर : पाचपावली पाेलिसांनी वाहन चाेरीच्या गुन्ह्यातील आराेपीला अटक केली आहे. आराेपीचे नाव सुबाेध ऊर्फ साेनू संजय वासिमकर (३७) असून ताे लष्करीबाग येथील निवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार माेतिबाग निवासी सुधीर शर्मा यांचे तीनचाकी परिवहन वाहन चाेरीला गेले हाेते. या वाहन चाेरीच्या प्रकरणात सुबाेध लिप्त असल्याची बाब पाचपावली पाेलिसांच्या लक्षात आली. त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. पीआय किशाेर नगरारे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

मावस बहिणीने दागिने चाेरल्याची तक्रार

नागपूर : लकडगंज येथे एका महिलेच्या घरातून तिच्या मावस बहिणीने सवादाेन लाखाचे दागिने चाेरी केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार छापरूनगर चाैक निवासी वर्षा जितेंद्र धिंगरा या साेमवारी दुपारी घरी हाेत्या. यादरम्यान त्यांची मावस बहीण टीना तेथे आली. तिने बेडरूमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये असलेले सवादाेन लाखाचे दागिने चाेरल्याची तक्रार महिलेने लकडगंज पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पाेलिसांनी चाेरीचे प्रकरण दाखल करून टीनाची विचारपूस केली. मात्र ती चाेरी केल्याचा इन्कार करीत आहे.

Web Title: Appeal to file a complaint against PAN Card Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.